महाराष्ट्र नाट्य परिषदेचे बाल नाट्य व नृत्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न

Khozmaster
3 Min Read

महाराष्ट्र नाट्य परिषदेचे बाल नाट्य व नृत्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न

लहानग्यांच्या अभिनय व नृत्य प्रतिभेला मिळाली नवी दिशा

नागपूर | दिनांक 23 जून 2025

महाराष्ट्र नाट्य परिषद, नागपूर तर्फे आयोजित बालनाट्य अभिनय व नृत्य प्रशिक्षण शिबिर दिनांक 5 जून ते 20 जून 2025 दरम्यान गुरुदेव सेवा मंडळ, आगाराम देवी चौक येथे संपन्न झाले. या शिबिराचा समारोप सोहळा 23 जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

समारोप कार्यक्रमाला नाट्यकर्मी डॉ. निलकंठ कुलसुंगे अध्यक्षस्थानी होते, तर जेष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक संजय भाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी ॲड. अशोक येवले, कुणाल गडेकर, राजेश कुंभळकर, समाजसेवक अशोकजी ठाकरे, महाराष्ट्र नाट्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र टेकाडे आणि शिबिराच्या मुख्य संयोजिका प्रा. डॉ. संगीता टेकाडे (विदर्भातील एकमेव महिला नकलाकार) यांचीही उपस्थिती लाभली.

या शिबिरामध्ये 4 ते 15 वयोगटातील सुमारे 90 मुला-मुलींनी सहभाग घेतला. बालकांच्या कलात्मकतेला वाव मिळावा यासाठी नृत्य, अभिनय, लावणी, मुजरा, पोवाडा, गरबा, गोंधळ, नकला अशा विविध प्रकारांत त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. ‘आशेचा अंत’, ‘विठ्ठल’, ‘झाशीची राणी’ यांसारखी बालनाट्ये लहानग्यांनी रंगभूमीवर सादर केली, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

संजय भाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “नाटक ही केवळ एक कला नसून ती आत्म-अविष्काराची साधना आहे. अशा शिबिरांमुळे बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला योग्य दिशा मिळते.” अन्य मान्यवरांनीही शिबिराच्या दर्जेदार आयोजनाचे आणि मुलांच्या उत्तम सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

शिबिर यशस्वी होण्यासाठी निर्मिती (अदिती) टेकाडे आणि नताशा ओगानिया यांच्या नेतृत्वाखाली रोशनी ओगानिया, भामि मसराम, कोमल ओगानिया, अक्षय चवडे, राजू दैवतकर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन आणि आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र टेकाडे यांनी केले.

या शिबिराच्या माध्यमातून नागपूरच्या रंगभूमीवर उदयोन्मुख बालकलाकारांचे एक आशादायक चित्र उभे राहिले आहे, हे निश्चित.

 

“टॉप ट्रेंडिंग ख़बरें”

पढ़ने के लिए लिंक पर क्लिक करें।”

👇👇👇👇👇👇👇👇👇

👉 16 लाख के बिल के लिए 18 घंटे तक रोकी गई मृतक मरीज की डेड बॉडी — पुलिस के हस्तक्षेप के बाद मिली बॉडी — क्या इंसानियत मर गई है?

👉 स्मार्ट शौचालय में अवैध वसूली — BJP पदाधिकारी गोपाल नगदीया ने NMC की पोल खोली, वीडियो वायरल

पुणे से नागपुर तक ट्रैफिक से बेहाल जनता: गडकरीजी खुद बने सिस्टम की विडंबना का हिस्सा

👉 ज़हर बनती ज़मीन, बुझती नदियाँ: खापरखेड़ा थर्मल प्लांट की राख में दफ़न होता एक गाँव, और उससे उठता सवाल – कब जागेगा सिस्टम?

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *