नागपूरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ आंदोलन
नागपूर, ता. १६ ऑगस्ट २०२५ –
मा. मच्छिंद्र रामराव सावळे यांच्या नेतृत्वात शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर सेवा प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा व विविध समाजघटकांच्या नेत्यांसह नागपूरातील नागरिकांनी अजनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करत ज्येष्ठ काँग्रेस नेते मा. बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
आंदोलनाची पार्श्वभूमी
-
दिनांक १६ ऑगस्ट रोजी, घुलेवाडी गावातील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे याने भक्तिपर कार्यक्रमात द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक विधाने केली.
-
यानंतर स्थानिक नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांना श्री. बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते ठरवत बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
-
१८ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये भंडारे याने थेट श्री. बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
नागरिकांचा आक्रोश
या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायाच्या पवित्रतेलाही धक्का बसला आहे.
यामुळे नागपूरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजघटक एकत्र येऊन आरोपीवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करत अजनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
निवेदन व मागण्या
मा. मच्छिंद्र रामराव सावळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र एस. राजकुमार यांना निवेदन देऊन मागणी केली की –
-
संग्राम बापू भंडारे याच्यावर जीवे मारण्याची धमकी, खोटे आरोप, द्वेष पसरवणे व सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कठोर कारवाई करावी.
-
परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत.
उपस्थित मान्यवर
या आंदोलनात मा. मच्छिंद्र रामराव सावळे, भगवानजी कांबळे, मनोज गावंडे, अरुण शास्त्रकार, माधवराव गावंडे, रमेश मामा राऊत, महेंद्र बारोकर, सुभाष पेंढारकर, अनिल चहांदे, सुभाष रामटेके, सागर पारखंडे, निकेश पाटील, शुभम पिल्लेवान, सचिन डोंगरे, शुभम शिरसाठ, माया घोरपडे, ममता धनविजय, हिंगणीकर ताई, प्रमिला राऊत, फोफरे ताई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Users Today : 23