*एसडीओ बंगल्या मागील भागात झाडांची छाटणी — नागरिकांमध्ये चर्चा, न.पा.कडून परवानगीचा दावा* खामगाव प्रतिनिधी

Khozmaster
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी ;-
खामगाव
तालुक्यातील *एसडीओ यांच्या बंगल्या मागील भागात सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकामामुळे परिसरात आज सकाळपासून हालचाल वाढली.* विद्युत विभागाच्या डिपी व पोल उभारणीसाठी *नाल्याच्या काठावरील झाडांची मोठ्या प्रमाणावर छाटणी* करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

सकाळपासून सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात *खळबळ माजली*, तर काही नागरिकांनी या छाटणीवर आक्षेप घेतला. त्यांनी स्थानिक दै. *लोकोपचार*शी संपर्क साधून **विनापरवानगी झाडांची कत्तल होत असल्याचा संशय व्यक्त केला.
न.प.कडून परवानगीचा दावा
या बाबत चौकशी केल्यानंतर छाटणी करणाऱ्या संबंधितांनी सांगितले की,
> “व्यापारी संकुलाच्या कामासाठी *विद्युत डिपी आणि पोल उभारण्याकरीता नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली आहे*. त्यानुसारच झाडांची आवश्यक छाटणी केली जात आहे.”
मात्र, *नगरपालिकेच्या अधिकृत परवानगीचे पत्र किंवा आदेश दाखवण्यात आले नाही*, त्यामुळे या परवानगीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
पर्यावरणप्रेमींकडून नाराजी
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी *झाडांची अंधाधुंद छाटणी थांबवावी, तसेच **न.प.ने या कामासंदर्भात पारदर्शक माहिती जाहीर करावी*, अशी मागणी केली आहे.
झाडांची छाटणी करताना *पर्यावरणीय मानकांचे पालन झाले का*, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
अधिकृत चौकशीची अपेक्षा

या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
*विद्युत विभाग, नगरपरिषद आणि महसूल प्रशासन* यांच्यात समन्वय साधून या घटनेची *स्पष्ट चौकशी* करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

0 8 8 0 6 3
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *