लोणार : सरकारी हमीभाव केंद्राच्या मंजुरीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा — हलद उत्पादकांना मिळणार ५३८० रुपये प्रतिक्विंटल दर

Khozmaster
2 Min Read

लोणार प्रतिनिधी ;-
लोणार : केंद्रीय मंत्री मा. प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर* यांच्या प्रयत्नांमुळे लोणार कृषि उत्पन्न बाजार समितीत सरकारी हमीभाव केंद्राला मंजुरी* मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या केंद्राच्या मंजुरीची माहिती अध्यक्ष प्रा. बळीराम मापारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा शिवसेना अध्यक्ष प्रा. मापारी यांच्यासह तालुका अध्यक्ष भगवान सुलताने, तालुका संघटक गजेन्द्र मापारी, युवा सेना अध्यक्ष गजानन मापारी, शहर अध्यक्ष पांडुरंग सरकटे आणि सुबोध संचेती उपस्थित होते.

– १५ नोव्हेंबरपासून खरेदीला सुरुवात

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, या केंद्रावर मालखरेदीची सुरुवात *१५ नोव्हेंबरपासून* होणार असून शेतकऱ्यांना *५३८० रुपये प्रतिक्विंटल दराने हलदीची खरेदी* करण्यात येणार आहे.
अध्यक्ष प्रा. बळीराम मापारी यांनी सांगितले की, “मराठवाडा आणि आसपासच्या भागातील हलद उत्पादक शेतकऱ्यांकडे त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ नव्हती. त्यामुळे लोणार कृषि उत्पन्न बाजार समितीने हलद खरेदीची पुढाकार घेतला. आता सरकारी हमीभाव केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना स्थिर दर आणि योग्य परतावा मिळेल.”

केंद्र सुलतानपूर उपमंडीत कार्यरत राहणार

हे केंद्र लोणार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सुलतानपूर उपमंडीत* कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी *आधार कार्ड आणि चालू वर्षाचा ७/१२ उतारा* सादर करून लोणार किंवा सुलतानपूर बाजार समितीत अर्ज करण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मोलाचे पाऊल

या निर्णयामुळे लोणार आणि परिसरातील हलद उत्पादक शेतकऱ्यांना स्थिरता, बाजारभावात पारदर्शकता आणि सरकारी दराची खात्री मिळणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाबद्दल आनंदाचे वातावरण असून, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ. रायमुलकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक सर्वत्र होत आहे.

0 8 9 4 5 8
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *