खैर कुणबी समाजाचा राज्यस्तरीय उपवर–उपवधू परिचय मेळावा संपन्न; २ हजारांहून अधिक उपस्थिती
नागपूर : खैर कुणबी समाज, पश्चिम नागपूर यांच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी कुसुमताई वानखेडे सभागृह येथे राज्यस्तरीय उपवर–उपवधू परिचय मेळावा व स्नेहमिलन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. समाजातील युवक–युवतींना वैवाहिक निर्णय प्रक्रियेत मार्गदर्शन मिळावे आणि परिचयासाठी सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला विदर्भभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेळाव्याचे उद्घाटन श्री. भगवंतराव रडके यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. महेश महाजन होते. तसेच निलेश महाजन, डी. के. आरीकर, प्रेमभाऊ झाडे, हिम्मतराव चतुर, प्रदीप वादाफळे, गुणेश्वर आरीकर, धोबे साहेब आणि डॉ. रमेश ठाकरे या मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात सुमारे २,००० समाजबांधवांनी उपस्थित राहून लाभ घेतला. युवक–युवतींचे परिचय सत्र, संवाद आणि वैवाहिक प्रक्रियेतील आवश्यक माहिती यामुळे अनेक कुटुंबांना योग्य मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संघटक महादेव वैद्य, तसेच मोहन डंभारे, कमलाकर बोरकुटे, राजेश पिंपले, राजेंद्र महाजन, ज्ञानेश्वर शेंडे, राजीव धानोरकर, रामचंद्र भगत, विजय चाफले, सौ. वर्षाताई रोड़े, सौ. कल्पनाताई रडके आणि मयुरी वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुबक संचालन सौ. वीणा शेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील मगरे यांनी मानले.
समाजातील एकोपा, परंपरा आणि प्रगतिशील दृष्टीकोनाचा साज चढवणारा हा राज्यस्तरीय मेळावा अत्यंतयशस्वी ठरला.

Users Today : 18