चित्रदुर्ग: हिरियूरजवळ बस-ट्रक अपघात, १७ प्रवाशांचा जळून मृत्यू

Khozmaster
1 Min Read

चित्रदुर्ग –

कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत. अपघातात कंटेनर ट्रक आणि बसचा समावेश असून, बसला लागलेल्या आगीत प्रवासी जळून मृत्यू पावले.
सदर घटना पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. बंगळूरूहून गोकर्णकडे जात असलेली बस कंटेनर ट्रकवर आदळली, त्यानंतर बसला मोठ्या धडकेनंतर आग लागली. अपघाताच्या वेळी बसमधील प्रवासी झोपले होते, त्यामुळे कोणालाही आग लागण्याआधी काही कळले नाही. या बसमध्ये एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते.
आग लागल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघातात कंटेनर ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, जखमींवर त्वरीत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. प्रशासन सध्या मृतांची ओळख पटवण्याचे आणि अपघाताची सखोल चौकशी करण्याचे काम करत आहे.
या घटनेची माहिती आणि व्हायरल व्हिडीओ पाहून स्थानिक आणि राज्यस्तरावर मोठा धक्का बसला आहे.

0 9 5 0 0 1
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *