आता UPI वर मिळणार हातउसणी पैसे; ‘Pay Later’ फीचर कसे काम करते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Khozmaster
2 Min Read

Pay Later Features on UPI: आर्थिक अडचणीच्या काळात तातडीच्या रकमेची गरज भासल्यास आता UPI च्या माध्यमातून हातउसणी पैसे घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. फिनटेक कंपनी BharatPe आणि Yes Bank यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Pay Later with BharatPe’ हे नवीन फीचर सादर करण्यात आले आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते UPI द्वारे उधारीवर पेमेंट करू शकणार आहेत.

काय आहे ‘Pay Later with BharatPe’ सुविधा?

‘Pay Later with BharatPe’ ही एक डिजिटल क्रेडिट सुविधा असून, तिच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात तत्काळ शिल्लक नसतानाही UPI पेमेंट करता येणार आहे. ही सेवा NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या प्रणालीवर आधारित असल्याने व्यवहार सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कोणतीही कागदपत्रे नाहीत, प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल

या सुविधेसाठी स्वतंत्र कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्याची आवश्यकता नाही. BharatPe आणि Yes Bank च्या डिजिटल ऑनबोर्डिंग प्रणालीद्वारे वापरकर्त्याचे क्रेडिट प्रोफाइल जलद तपासले जाते. काही मिनिटांतच पात्रता निश्चित करून उधारीची रक्कम मंजूर केली जाते.
ही रक्कम UPI च्या माध्यमातून थेट पेमेंटसाठी वापरता येते. त्यामुळे हॉटेलचे बिल, खरेदी किंवा दैनंदिन व्यवहार तात्काळ पूर्ण करता येतात.

45 दिवसांपर्यंत बिनव्याजी वापर

या योजनेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे मंजूर झालेली रक्कम 45 दिवसांपर्यंत कोणत्याही व्याजाशिवाय वापरता येते. वापरकर्त्याने या कालावधीत संपूर्ण रक्कम परत केल्यास कोणताही अतिरिक्त शुल्क किंवा व्याज आकारले जाणार नाही.
विशेषतः लघुउद्योग, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

वेळेत परतफेड न झाल्यास EMI पर्याय

जर वापरकर्त्याला 45 दिवसांच्या आत रक्कम परत करणे शक्य नसेल, तर त्याच्यासाठी EMI (हप्ते) चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
BharatPe कडून 3 महिन्यांपासून ते 12 महिन्यांपर्यंत सोप्या हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सुविधा दिली जाते. यामुळे अचानक आर्थिक ताण येण्याची शक्यता कमी होते.

UPI वापरकर्त्यांसाठी नवी संधी

UPI आधारित ‘Pay Later’ सुविधा सुरू झाल्याने छोट्या रकमेच्या गरजांसाठी मित्र-नातेवाईकांकडे हात पसरण्याची गरज कमी होणार आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देणारी ही योजना भविष्यात अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

0 9 4 9 9 6
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *