मलकापूर प्रतिनिधी –
मलकापूर – भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करत मलकापूर येथील महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सांभाळले.
कार्यक्रमास प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आय क्यू ए सी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, प्रा. संदीप खाचणे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये तसेच तरुण पिढीची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, संविधानाने दिलेले अधिकार जपताना कर्तव्यभावना अंगीकारणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे.
कार्यक्रमास मलकापूर येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विपिन खडसे (एमबीबीएस, एमएस), संत गजानन हॉस्पिटल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. वैभव राणे (एमबीबीएस, एमडी), राणे हॉस्पिटल यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीताने परिसरात देशभक्तीची भावना निर्माण केली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, सदस्य पराग पाटील तसेच प्रमोद नाफडे व आदिनाथ किंगे हे मान्यवर देखील उपस्थित होते. एनसीसी पथकाने शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सदाशिव लवंगे यांनी केले. संपूर्ण सोहळा शांततेत, शिस्तीत आणि यशस्वीरीत्या पार पडला, ज्यामुळे महाविद्यालय परिसरात राष्ट्रभक्ती, एकता आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
मलकापूर: महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment