जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read

उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड ः तालुक्यातील भांबरखेडा येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय गणराज्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय तातूभाऊ देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीकांत महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय निलेश शेंबडे साहेब, पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब, बीट जमादार आठवले साहेब उपस्थित होते. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तांगराव कदम, भाजपा मंडळ अध्यक्ष पुसद डॉ. अजित चंदेल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनवर, केंद्रप्रमुख अनिल बरडे, संस्थापक अध्यक्ष दिपक धर्माधिकारी, सचिव कुणाल वानखेडे तसेच मुख्याध्यापक तिरुपती मुंडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ध्वजपूजन करून मेजर श्रीकांत महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत घेण्यात आले.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सामूहिक कवायतीद्वारे मानवंदना सादर केली. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार तंबाखूमुक्त शपथ, कॉपीमुक्त शपथ आणि साक्षरता अभियानाची शपथ उपस्थितांनी घेतली. यानंतर उपमुख्याध्यापिका रामेश्वरी मुंडे मॅडम यांनी उपस्थितांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक, सेवक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुख्याध्यापक तिरुपती मुंडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे संस्थापक अध्यक्ष दिपक धर्माधिकारी सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला.

0 9 4 9 8 4
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *