सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नागवंशी संघपाल पनाड यांची निवड

Khozmaster
2 Min Read

सुलतानपूर प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नागवंशी संघपाल पनाड यांची अत्यंत चुरशीच्या लढतीत निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच गोपाल भानापुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सुलतानपूर ग्रामपंचायत कार्यालयात २४ जानेवारी २०२६ रोजी विशेष मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सकाळी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. दुपारी १२ ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली, तर दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुपारी २ वाजता सभेला सुरुवात होऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवडणुकीत नागवंशी संघपाल पनाड यांना ९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वैभव टकले यांना ८ मते प्राप्त झाली. अवघ्या एका मताच्या फरकाने नागवंशी संघपाल पनाड यांनी विजय मिळवून उपसरपंचपदावर आपली मोहोर उमटवली.
नागवंशी संघपाल पनाड हे तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी ओळखले जातात. ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार योजना, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांची ठाम व स्पष्ट भूमिका आहे. अल्पावधीतच त्यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे.
उपसरपंच म्हणून नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, प्रशासन अधिक पारदर्शक होईल आणि जनहिताची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

0 9 4 9 8 4
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *