वसमत प्रतिनिधी –
वसमत – वसमत वकील संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित एडवोकेट क्रिकेट लीग स्पर्धेत वसमत बी टीमने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. जिल्हा परिषद मैदान, वसमत येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १३ संघांनी सहभाग नोंदवला होता.
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात वसमत बी टीमने वाशीम वकील संघावर मात करत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले, तर वाशीम संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत वाशीम, परभणी, हिंगोली, औंढा, कळमनुरी, नांदेड तसेच वसमत येथील वकील संघ व कोर्ट स्टाफच्या संघांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामना रंगतदार ठरला.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास जिल्हा न्यायाधीश डी. बी. बागडे साहेब, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अ. द. पुंडलिक साहेब आणि कनिष्ठ न्यायाधीश पी. पी. नातू मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष प्रतिष्ठा लाभली.
प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. यासोबत मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट टीम अशी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.
वसमत बी टीमने सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध खेळ करत आपली सरसता सिद्ध केली. संघातील अॅड. अझरुद्दीन यांनी अष्टपैलू कामगिरी करत मॅन ऑफ द सिरीज तसेच बेस्ट बॉलर हे मानाचे पुरस्कार मिळवले. बी टीममधील अन्य खेळाडूंनाही बेस्ट बॉलर व बेस्ट बॅट्समन अशी विशेष पारितोषिके मिळाली.
या यशस्वी आयोजनासाठी वसमत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र साखरे, उपाध्यक्ष शेख मोहसीन, सचिव मुरंबेकर, कोषाध्यक्ष नाहीद सिद्दीकी तसेच अॅड. सोहेल सिद्दीकी, अॅड. रंगनाथ देशमुख, अॅड. विश्वास अन्वेकर, अॅड. विशाल साखरे आदींनी मोठा परिश्रम घेतला.
वसमत बी टीमच्या या यशामुळे वसमत वकील संघात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वसमत: एडवोकेट क्रिकेट लीग – वसमत बी टीम विजेत्या ठरली
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment