जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेहकर येथे उत्साहात शुभारंभ

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी –
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ सोमवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता तालुका क्रीडा संकुल, मेहकर येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मेहकरचे गटविकास अधिकारी डी. बी. खरात हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. एम. जाधव, नंदकिशोर मेटांगळे, प्रमोद दादा रायमुलकर तसेच एम. एस. वानखेडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, संघभावना आणि सकारात्मक उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या उपक्रमांतर्गत विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक सादरीकरणांचेही आयोजन करण्यात आले आहे. अशा कार्यक्रमांमुळे कर्मचारी वर्गातील सुप्त कला-गुणांना वाव मिळतो, तसेच मानसिक तणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

0 9 4 9 8 3
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *