शासनाचे पायाभूत सुविधांसह विकासाला प्राधान्य : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Khozmaster
2 Min Read

वाशीम प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व आवश्यक निवास सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना अधिक गतिमान, प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
जिल्ह्यातील प्रशासकीय सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित शासकीय निवासस्थानाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. पायाभूत सुविधांसह सर्वांगीण विकासाला शासनाने प्राधान्य दिले असून, त्याच अनुषंगाने अशा इमारतींची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेकर यांनी नवनिर्मित शासकीय निवासस्थानाच्या बांधकामाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, इमारतीत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, प्रशस्त आणि सोयीस्कर निवास व्यवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पोलीस अधीक्षक अनुज तारे, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपविभागीय अभियंता संचित शिंदे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या शासकीय निवासस्थानात वीज, पाणी, स्वच्छता व्यवस्था, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत तसेच इतर आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता येऊन वेळेवर निर्णय प्रक्रिया आणि सेवा पुरवठा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 9 8 4
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *