चिखली प्रतिनिधी –
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखली न्यायालयातील न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच विधिज्ञ यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील वाढते कामकाज लक्षात घेता अधिकारी, कर्मचारी व वकिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने विधिज्ञ संघ चिखली व डॉ. स्वप्नील भराड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार ‘राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व वकिलांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली.
आरोग्य शिबिरात डॉ. सुजाता भराड यांच्यासह नर्सिंग स्टाफ प्रविणी सोळंकी, भाग्यश्री सगट, विष्णू यंगड व कपिल शेवाळे यांनी आरोग्य तपासणी व आवश्यक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी न्यायालयीन अधिकारी आय.ए.वाय.ए. खान, एस.एच. उके, एम. व्ही. पौळ तसेच चिखली वकील संघाचे अध्यक्ष सतीश गवई यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरास न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिखली न्यायालयात आरोग्य शिबिराचे आयोजन
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment