कारंजा प्रतिनिधी –
स्थानिक जे. सी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक २४ जानेवारी रोजी ‘संस्कृती’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मानस, मुक्तांगण व अंकुर या हस्तलिखितांचे विमोचन मुख्याधिकारी महेश वाघमोडे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, संस्थेचे सचिव अमलप्रभ चवरे तसेच जे. सी. हायस्कूलचे माजी प्राचार्य उदय नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी विज्ञान व कला प्रदर्शनांचे उद्घाटनही करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध शाखांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. इतिहास प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले महत्त्वाचे किल्ले, विविध ऐतिहासिक लढाया, मानवाचा विकास व उत्क्रांती या विषयांवर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या. या प्रतिकृतींना विद्यार्थिनी प्रणिती मोरे हिने ब्राह्मी लिपीत शीर्षके दिली. तसेच भूगोल प्रदर्शनामध्ये विविध भौगोलिक रचना प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आल्या.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी महेश वाघमोडे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, संस्थेचे सचिव अमलप्रभ चवरे, प्राचार्य भारत हरसूले, मुख्याध्यापिका अनिता चोपडे, पर्यवेक्षक प्रशांत गंधक यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे कौतुक केले.
जे. सी. हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
0
9
4
9
8
3
Users Today : 14
Leave a comment