खामगाव प्रतिनिधी –
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा विशेष सत्कार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला.
यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित निवासी मूकबधिर विद्यालय, खामगाव येथील विद्यार्थी कौशिक प्रेम टूनलाईट याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कौशिक याने गुजरात राज्यातील पोरबंदर येथे आयोजित राष्ट्रीय समुद्रवीर महोत्सव २०२६ अंतर्गत झालेल्या ५ किलोमीटर जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वात कमी वयाचा स्पर्धक म्हणून त्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत चौथा क्रमांक पटकावला.
कौशिकच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचा तसेच खामगाव तालुक्याचा नावलौकिक वाढल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, मुख्याध्यापक डॉ. प्रकाश जगताप यांच्यासह अधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूचा सत्कार
0
9
4
9
8
4
Users Today : 15
Leave a comment