बहिरम : शेतकऱ्यांना न्याय मिळवायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याला भगतसिंग व्हावे – रविकांत तुपकर

Khozmaster
2 Min Read

चांदूर बाजार प्रतिनिधी :
विदर्भातील तीर्थक्षेत्र बहिरम येथे २४ जानेवारी रोजी सन १९७५ च्या बहिरम कापूस आंदोलनाचा ५१ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले, “शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्याय व हक्क मिळवायचा असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याला भगतसिंग व्हावे लागेल.”
प्रास्ताविक करताना प्रकाश साबळे यांनी कापूस, तूर तसेच इतर पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य व सन्मानजनक भाव मिळावा, ही ठाम मागणी मांडली. श्रद्धांजली सभा व कापूस परिषदेमध्ये शेकडो शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बहिरम कापूस आंदोलनातील शहीद शेतकरी विठ्ठलराव दुतोंडे, तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणारे स्व. दादासाहेब हावरे, स्व. भाऊसाहेब साबळे, स्व. शंकरराव बोबडे, स्व. मामराज खंडेलवाल, स्व. केशरबाई सिकची, स्व. वामनराव खलोकर, स्व. विनायकराव कोरडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्वानुमते ठरवण्यात आले की बहिरम कापूस आंदोलनाचे शेतकरी स्मारक उभारावे आणि सभागृहाचे नामकरण ‘स्व. विठ्ठलराव दुतोंडे सभागृह’ असे करावे.
मुख्य मार्गदर्शक म्हणून रविकांत तुपकर, विजय विल्हेकर, जगदीशनाना बोंडे, गजानन अहमदाबादकर, संजय कोल्हे, जानराव पाटील, सुधाकर हावरे, मुकुंद उभाड, पंकज आवारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांनी केले, तर संचालन कौस्तुभ यांनी केले. आभार प्रदर्शन गोपाल भालेराव यांनी केले. यशस्वीतेसाठी सागर महल्ले, गणेशराव कडू, नीलेश उभाड, मनीष हावरे, मंगेश डोंगरे, अक्षय साबळे, कुलदीप विधळे, अक्षय सरोदे, योगेश बोबडे, नंदू वैराळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *