पथ्रोट प्रतिनिधी :
गोंडवाघोली शेतशिवारात सोमवारी सकाळी शेतातील गोठ्यात बांधलेली वगारी बिबट्याने फस्त केल्याची घटना उघडकीस आली. शेतमालक शेख इस्माईल शेख इसराइल यांच्या गोठ्यामध्ये पाच म्हैस, एक वगार, चार बैल आणि चार बकऱ्या ठेवलेल्या होत्या.
सकाळी शेतात गेलेल्या इस्माईल यांनी गोठ्यातील वगार दिसल्याचे आढळले नाही. जवळच्या शेतात शोध घेतल्यावर वगारीची शिकार झाल्याचे आढळून आले. रस्त्यावर असलेल्या पगमार्कवरून ही घटना हिंस्त्र प्राण्याचे कृत्य असल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी राउंड ऑफिसर सुधीर हाते व वनरक्षक अंकिता मुंडे यांनी पंचनामा केला. प्राथमिक पाहणीवरून शिकार करणारा प्राणी बिबट्याचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे.
शेख इस्माईल यांनी सांगितले की, यापूर्वीही याच परिसरात बिबट्याने बकरी आणि श्वानाची शिकार केली होती. यामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पथ्रोट : शेतातील वगारी बिबट्याने फस्त, शेतकऱ्यांमध्ये दहशत
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment