चिखली : मराठी ही केवळ भाषा नाही, संस्कृतीची ओळख – प्रा. डॉ. सुनील पवार

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :
चिखली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुनील पवार यांनी भाषण दिले. त्यांनी सांगितले, “मराठी केवळ भाषा नसून ती आपली ओळख आणि संस्कृती आहे. नवव्या शतकापासून मुकुंदराजांपासून ते संत तुकाराम व मोरोपंतांपर्यंत अनेकांनी हिला ज्ञानभाषा बनवले आहे. ही भाषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल.”
डॉ. पवार यांनी मराठी भाषेसमोरील आव्हाने स्पष्ट करत कार्यालयीन तसेच दैनंदिन जीवनात मराठीचा वापर, वाचन, तसेच मराठी नाटके व गाणी पाहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश खान, तर प्रमुख उपस्थितीत न्यायाधीश स्मिता उके, न्यायाधीश मेघा पौळ तसेच चिखली वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सतीश गवई होते. यावेळी मोठ्या संख्येने विधिज्ञ, पक्षकार आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुनीता जाधव यांनी केले, तर आभार अॅड. बी. सी. वानखडे यांनी मानले.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *