देऊळगाव राजा : प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :
स्वतंत्र भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक पी.एम.श्री. फातिमा शेख नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा सप्ताह आणि कॅन्टीन डेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधुरी तुषार शिपने होत्या, तर उद्घाटक म्हणून आमदार मनोज कायंदे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आमदार मनोज कायंदे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे कौतुक करत शैक्षणिक गुणवत्तेकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी भौतिक सुविधांची कमतरता होऊ न देण्याची ग्वाही शाळा प्रशासनास दिली.
नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक अब्दुल हई यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाल्याचे समाधान व्यक्त केले.
ध्वजारोहण नगरसेविका उषाताई गीते यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक वर्ग तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे कलागुण उभारण्यास तसेच शालेय संस्कृतीला चालना देण्यास मोठा मंजुषा प्रभाव पडल्याचे आयोजकांनी नमूद केले.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *