देऊळघाट येथील ईकरा उर्दू ज्युनिअर कॉलेज व ईकरा पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील ईकरा उर्दू ज्युनिअर कॉलेज व ईकरा पब्लिक स्कूल येथे २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शेख अहमद अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक विदर्भ दस्तकचे संपादक शेख इंद्रीस शेख नझीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास ईकरा उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आसिफ सर, ईकरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शेख जावेद सर यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी संस्थेचे सचिव जमील खान मुनीर खान, मुनीर खान अब्बास खान, सहसचिव वसीम खान आयुब खान, अय्युब खान उमर खान, आयुब खान युसुफ खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, नाटिका, गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या सादरीकरणांना उत्स्फूर्त दाद दिली.
या सोहळ्यास विद्यार्थ्यांचे पालक, इतर शाळांतील विद्यार्थी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या, उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *