देऊळगाव राजा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित
दादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी मिळताच राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा मतदार संघामध्ये दुःखाचे चावट पसरले. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वपक्षीय नेते आणि शहरातील असंख्य नागरिक अजितदादा यांच्या निधनाची हळहळ व्यक्त करत होते अनेकांना अश्रू अनावर होत नव्हते ज्यांच्या उपस्थितीने आशा मिळत होती तेच आज केवळ आठवणीत उरले आहेत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आक्रोश फोडत होते त्यामुळे शहरातील वातावरण अगदी निराशमय झाले होते त्यांच्या जुन्या आठवणी आणि त्यांचा लाभलेला सहवास आम्ही जीवनभर विसरू शकत नाही अशी भावना सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी याप्रसंगी व्यक्त केली
अजित पवार यांच्या निधनाने दे.राजात शोककळा शहरातील दुकाने बंद ठेवून श्रध्दांजली
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment