महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेता हरवला…दादांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रध्दांजली

Khozmaster
2 Min Read

साखरखेर्डा प्रतिनिधी : राज्याचे तडफदार तथा कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येथे धडकताच सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज आपण पोरके झालो. ही राजकीय आणि सामाजिक पोकळी कधीही भरून येणार नाही अशा शब्दांत अनेकांनी श्रध्दांजली अर्पण केली. येथील बसस्थानकावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सर्व प्रथम अजित दादांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले आणि नंतर शोकसभा घेऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी (अ.प.), राष्ट्रवादी (श. प.), भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे), वंचित बहुजन महासंघ, आदी विविध पक्षांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी दिलेल्या शब्दांचे पक्के असणाऱ्या अजित दादांच्या झंझावाती सामाजिक व राजकीय जीवन प्रवासावर बाबुराव मोरे यांनी प्रकाश टाकला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेनेचे माजी सरपंच महेंद्र पाटील, भाजपचे राज्य प्रतिनिधी रावसाहेब देशपांडे, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, उपसरपंच संग्राम राजपूत, माजी सरपंच कमलाकर गवई, रामदास सिंग राजपूत, आशिष पोंधे, चंद्रशेखर शुक्ल, ललित अग्रवाल, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर, युवासेनेचे संदीप मगर, दादाराव गवई, सुनील रिंढे , दर्शन गवई, दिलीप इंगळे , सुनील जगताप, बबन अग्रवाल, नंदू कोतवा, आदित्य तिवारी, गोपालसिंग राजपूत, सिताराम काळे, शुभम राजपूत, जमना प्रसाद तिवारी, नारायण अग्रवाल, संदीप खिल्लारे, देवानंद महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेता हरवला… z दादांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रध्दांजली साखरखेर्डा दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करतांना येथील सर्वपक्षीय पदाधिकारी. खंडागळे, राजू लोढे, अशोक इंगळे, संतोष गाडेकर, आसाराम कामे शिवा पाझडे, निलेश पोंधे, गजानन गवई, आदींची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्र्यांच्या दु:खद निधनानिमित्त येथील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *