चिखली प्रतिनिधी :
जलसंधारण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात दाखवलेल्या कथित नीच मानसिकतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
यासंदर्भात चिखली तहसीलदार विजय सवडे यांना वंचित बहुजन आघाडी चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाशिक येथे पार पडलेल्या गणतंत्र दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक संविधाननिर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे टाळले. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून समाजातील भावना दुखावणारा आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,
गिरीश महाजन यांना तात्काळ मंत्रीपदावरून तसेच आमदार पदावरून हटविण्यात यावे.
त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या निवेदनावर संजय धुरंधर, रमेश गवई, सागर आराख, पृथ्वीराज बोर्डे, दीपक जाधव, जितेंद्र निकाळजे, प्रदीप खंडारे, राजू खंडारे, गुलाब साळवे, मुकिंदा खरात, गायकवाड, गवई, भिसे, मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
चिखली : गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment