खामगाव प्रतिनिधी : या घटनेने राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच नगर पालिका निवडणुकीदरम्यान खामगाव शहराला भेट देवून खामगाव शहराच्या नागरिकांना संबोधित केले होते. हीच भेट खामगाव करांच्या कायम लक्षात राहणारी आहे.
या अगोदरही अजितदादांनी खामगाव शहराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांनी ना. अॅड. आकाश फुंडकर यांच्या घरी सांत्वनपर भेट देवून ना. आकाश फुंडकर यांच्या परिवाराची विचारपूस केली होती. तसेच खामगावातील अनेक सभांनाही त्यांनी संभोधित केले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्पष्ट वक्तेपणा विकासात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट नातं जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. तसेच परखड आणि बिनोदी भाषणाने खामगावकरांच्याही मनात घर केलेले होते .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले.
0
9
4
9
8
0
Users Today : 11
Leave a comment