सरोवर वाचवण्यासाठी लोणार शहर कडकडीत बंद

Khozmaster
3 Min Read

लोणार, दि. २८ (प्रतिनिधी

लोणार सरोवरातील सातत्याने वाढत असलेल्या पाणीपातळीवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहरात सर्वपक्षीय नेते व शहरवासीयांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून कडकडीत बंद पाळण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होत असून, हे सरोवर केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अद्वितीय भू-वैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या जागतिक वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरोवराची पाणीपातळी सुमारे २० ते २५ फूटांनी वाढल्याने पाण्याचे मूळ स्वरूप बदलत आहे. पूर्वी ११.५ असलेला पीएच स्तर ७.५ पर्यंत खाली आला असून, क्षारता ६००० वरून ४०० पर्यंत घसरलो आहे. त्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली असून सध्या सरोवरात मासे उत्पन्न झाले आहेत. भविष्यात घातक जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जैवविविधता नष्ट झाल्यास हे सरोवर सामान्य तलावात रूपांतरित होऊन पर्यटनावर परिणाम होईल, ज्यामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, पाणीपातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमळजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर, गैवनशहा वली यांचे सोळाव्या शतकातील दर्या तसेच इतर प्राचीन मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत, गर्भगृहात पाणी शिरल्याने मूर्ती व मंदिराची मोठ्‌या प्रमाणात हानी होत असून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. शहरातील सांडपाणी तसेच गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ स्वरूप विघडत आहे. याबाबत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकान्यांशी चर्चा करून तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लोणारच्या नगराध्यक्षा मीरा भुषण मापारी, Buldhana Edition काँग्रेस नेते भूषण मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल बच्छीरे सह विविध पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकत्यांनीही यासंदर्भात सातत्याने आवाज उठवला आहे. सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत (धारतीर्थ, रामगया आदी) काठावरच अडवून उपसा सिंचन व वॉटर लिफ्टिंगद्वारे ते पाणी लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे. तसेच शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पुरातत्व विभाग, वन्यजीव विभाग व महसूल विभाग यांच्या समन्वयातून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीचे नियोजन करावे. यासाठी सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजनांचा मास्टर प्लॅन तयार करून तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल दिल्ली रघुबीर सिंग रावत, केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिह शेखावत, प्रधानमंत्री नरेंद्र मोवी तसेच युनेस्को वल्र्ड हेरिटेज सेंटर (फ्रान्स) चे डायरेक्टर जनरल खालिद अल-एनानी यांना ई-मेल व प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे. तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने, आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे

0 9 4 9 8 0
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *