अजितदादांसाठी मुंबईकरही हळहळले

Khozmaster
2 Min Read

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी हा हा म्हणता राज्यासह देशभर पसरली. राजकारणातील हसरा चेहरा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने मुंबईकरदेखील दुःखात बुडाल्याचे चित्र बुधवारी दिसत होते. सकाळच्या वेळीच बारामती येथे अजित पवार यांचे विमान कोसळल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर येऊ लागल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली. घरांमध्ये, लोकल बस प्रवासातील मुंबईकरांच्या तोंडी अजित पवारांच्या निधनाचीच चर्चा ऐकायला पाहायला मिळत होती. अचानक दादांच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या मुंबईकरांच्या मोबाईलचे डीपी-स्टेटस अजित
दादांच्या छायाचित्रांनी भरून गेले होते. अनेकांनी दादांना श्रद्धांजलीपर संदेश आपल्या मोबाईलमध्ये ठेवल्याचे दिसून आले. राजकारणाशी काही देणे-घेणे न ठेवणाऱ्या झेन झी म्हणजेच तरुण वर्गही लोकप्रिय नेता असलेल्या अजितदादांबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत होते.
अजित पवारांचे राजकारण
तसे पाहायला गेल्यास ग्रामीण भागातील मात्र पुण्या-मुंबईतील नागरिकांनाही ते हवेसे वाटणारे नेते होते. त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे ते त्यांच्या सभांमध्ये रंगत आणत असत. वृत्तवाहिनीवर अजितदादांचे भाषण सुरू असले तर कोणीही कितीही घाईत असला तरी त्यांचे भाषण ऐकायचाच. त्यांची विनोद बुद्धी आणि हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा होता. त्यांच्या
मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अनेक जणांकडून चांगला नेता गेला, हेच वाक्य बुधवारी दिवसभर ऐकायला मिळत होते. मंत्रालय, सचिवालयातील कर्मचाऱ्यांकडून विशेष करून अजितदादांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्यासारखा प्रशासनाची जाण असलेला सध्याच्या घडीला दुसरा नेता नाही, असे मत एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याने प्रवासादरम्यान सांगितले. मुंबईत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नसले तरी त्यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी अजितदादांना श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर अनेक ठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात आले होते.
Mumbai Edition

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *