महाराष्ट्राच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अखेरचा निरोप

Khozmaster
1 Min Read

बारामती :
महाराष्ट्राच्या राजकारणात अमीट ठसा उमटवणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला लाभली. विकासाभिमुख दृष्टीकोन, कामातील काटेकोरपणा, प्रशासनावर असलेली पकड आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करण्याची त्यांची भूमिका — हे सारे गुण त्यांना वेगळे ठरवत होते.
जनतेसाठी अखंड झटणारे, ठाम निर्णय घेणारे आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असे हे व्यक्तिमत्त्व आज महाराष्ट्राने गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले अमूल्य योगदान आणि त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *