अंढेरा प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर अंढेरा येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, युवक व ग्रामस्थांच्या वतीने स्वयंस्फूर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली सर्व दुकाने बंद ठेवली होती.
गावात शोकमय वातावरण पसरले असून, या प्रसंगी आयोजित श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय पदाधिकारी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजितदादा पवार यांच्या कार्याला व स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्याने एक कर्तृत्ववान, अभ्यासू व विकासाभिमुख नेता गमावल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंढेरा येथे कडकडीत बंद पाळून अजितदादा पवारांना श्रद्धांजली
0
9
4
9
7
5
Users Today : 6
Leave a comment