कोरोना भत्त्यासाठी आशा वर्कर्सचे आंदोलन थकीत २३ महिन्यांचा भत्ता त्वरित द्यावा – अन्यथा १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :
गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला २३ महिन्यांचा कोरोना भत्ता त्वरित देण्यात यावा, या मागणीसाठी आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आज पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.
राज्य व जिल्हा स्तरावरून वारंवार लेखी आदेश दिले असतानाही ग्रामपंचायतींकडून हा भत्ता देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सीटू संघटनेच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्यापही संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी इशारा दिला की,
“तत्काळ भत्ता अदा करण्यात आला नाही, तर १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल.”
दहावे आंदोलन
२७ जानेवारी रोजी देऊळगाव राजा पंचायत समिती कार्यालयासमोर दहावे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आंदोलनात सहभागी
या आंदोलनात
निर्मला मागे, उषा खंडारे, मीना इंगळे, मीना नागरे, ज्योती बनकर, संगीता चेके, अरुणा गवई, संतोषी नागरे, नर्मदा शिरसाट, अनुसया शेरे, रंजना निकाळजे
यांच्यासह तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व अर्धवेळ स्त्री परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळायलाच हवा, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली.

0 9 4 9 7 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *