खामगाव प्रतिनिधी :
शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या जिमखाली एका तरुणाला बोलावून त्याच्यावर लोखंडी अवजाराने हल्ला केल्याची घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वैष्णव राजेश काचकुरे (वय २०, रा. शनिपॅलेस, आदर्श नगर, खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्यन राहुल तायडे (वय अंदाजे २५, रा. शंकरनगर, खामगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोन करून जिमखाली बोलावले. तेथे आरोपीने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर हातातील लोखंडी अवजाराने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने “२६ जानेवारीला काय केले होते?” असे म्हणत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५ (२), ११८ (१) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तरुणावर लोखंडी अवजाराने हल्ला जिमखाली बोलावून डोक्यात मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
0
9
4
9
7
5
Users Today : 6
Leave a comment