आठ दिवसांत दुचाकी चोरीचा पर्दाफाश धाड पोलिसांची दमदार कामगिरी; रुईखेड येथील चोरटा जेरबंद

Khozmaster
2 Min Read

धाड प्रतिनिधी :
स्थानिक राजे संभाजी चौक परिसरातील एका घरासमोरून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात धाड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरट्यास अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.
स्थानिक हनुमान गल्ली परिसरात राहणारे शेषराव नामदेव ठाकरे यांची दुचाकी क्रमांक एमएच-२८-एएच-४१०४ ही त्यांचा चुलत भाऊ नितीन जनार्दन ठाकरे याने वापरासाठी नेली होती.
दिनांक २१ जानेवारी रोजी सदर दुचाकी बावस्कर यांच्या किराणा दुकानासमोर उभी करण्यात आली होती. मात्र रात्री १०.१५ ते २२ जानेवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
या प्रकरणी २२ जानेवारी रोजी धाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासातून चोरट्याचा शोध
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण, युवराज मुळे, वैशाली कोरडे, इंगळे व सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.
तपासात मधुकर रंगनाथ रामफळे (वय २८, रा. रुईखेड मायंबा) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
अवघ्या आठ दिवसांत गुन्हा उघड
पोलीसांच्या तत्परतेमुळे अवघ्या आठ दिवसांत हा गुन्हा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

0 9 4 9 7 6
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *