सुलतानपूर प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच महाराष्ट्रभर शोककळा पसरली. यावेळी सुलतानपूरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली गेली, तसेच उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून शोकसंवेदना व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रमात डॉ. हेमराज लाहोटी, संघपाल पनाड, सदानंद तेजनकर पाटील, शेख मुख्तार, डॉ. विनोद भानापुरे, राजेश पिंपरकर, सुखदेवराव झोरे, सुभाष खेत्रे, सागर राजगुरू, रवी रिंढे, शेख सुलतान, अश्रू भानापुरे यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलतानपूर : सर्वपक्षीय श्रद्धांजली – अजितदादा पवार यांना आदरांजली
0
9
4
9
7
6
Users Today : 7
Leave a comment