सिंदखेडराजात मनसेची ताकद वाढवणारे शिवादादा पुरदरे

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :

Maharashtra Navnirman Sena स्थापनेपासून पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले शिवादादा पुरदरे यांनी विद्यार्थी सेनेपासून जिल्हा पातळीपर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. विद्यार्थी सेना शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे भूषवली.
सिंदखेड राजा मतदारसंघात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने उभी करत त्यांनी संघटन बळकट केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अडचणीत सापडलेल्या विधवा महिलांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली.
विद्यार्थी सेनेच्या शाखा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्या असून महाविद्यालयांसमोर संघटनात्मक जाळे मजबूत करण्यात आले. पक्षाचा आदेश मिळताच सिंदखेडराजा शहरात सर्वप्रथम आंदोलन उभे करण्याचा मानही विद्यार्थी सेनेला मिळाला. विद्यार्थी सेना अध्यक्ष Amit Thackeray यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात.
मनसेमधून अनेक जण बाहेर पडल्यानंतरही पक्ष जिवंत आणि सक्रिय ठेवण्याचे काम शिवादादा पुरदरे यांनी सातत्याने केले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *