खामगाव तालुका : घाटपुरी शिवारात बिबट्याचा वावर; दोन महिला मजूर झाडावर चढल्या

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी :

तालुक्यातील घाटपुरी शिवारात शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी बिबट्या दिसताच शेतकरी व मजुरांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्याला घाबरून दोन महिला मजूर जीव वाचवण्यासाठी झाडावर चढल्या. पोलीस व वनविभागाच्या मदतीने त्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आले.
उसाच्या मळ्यात बिबट्याचा वावर
घाटपुरी येथील गोकुळ चोपडे यांच्या उसाच्या मळ्यात बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे शेतकरी व मजूर वर्गात मोठी दहशत पसरली आहे.
पोलीस व वनविभागाचे पथक दाखल
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू पथकही उसाच्या मळ्यात दाखल झाले आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्याची तयारी करण्यात येत आहे.
प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा
तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार निखिल पाटील, तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शेतकरी व मजुरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला असून, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परिसरात वनविभाग व पोलीस यांचे संयुक्त पथक गस्त घालत असून, बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *