बुलढाणा येथे ९ मार्च रोजी ‘डाक अदालत’ पोस्ट सेवांवरील प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी विशेष उपक्रम

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

India Post (भारतीय डाक) विभागातर्फे तक्रारींच्या निवारणासाठी सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा डाकघर विभागात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.
पोस्टाच्या कामकाजाबाबत केलेल्या तक्रारींचे सहा आठवड्यांत निवारण झाले नसल्यास अशा प्रकरणांची दखल या डाक अदालतीत घेतली जाणार आहे.
पोस्टाची सेवा ही देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांना दर्जेदार सेवा देणे व ग्राहक समाधान वाढविणे हा पोस्ट खात्याचा उद्देश आहे. मात्र, पत्रव्यवहार किंवा इतर सेवांमध्ये काही त्रुटी राहिल्यास तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारींवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी डाक अदालतीचे आयोजन करण्यात येते. कोणत्या तक्रारींची होणार दखल?
टपाल सेवा
स्पीड पोस्ट
पार्सल सेवा
बचत बँक खाते
मनीऑर्डर सेवा
तक्रार अर्जात सर्व तपशील नमूद करणे आवश्यक आहे. विशेषतः:
तक्रारीची तारीख
मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यांकडे पाठवली त्यांचे नाव व पद
संबंधित कागदपत्रे
तक्रारी डाकघर अधीक्षक गणेश आंभोरे, बुलढाणा विभाग यांच्या नावे दोन प्रतीत पाठवाव्यात. या तक्रारी शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ पर्यंत पोहोचतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करून घ्यावे, असेही पोस्ट विभागाने कळविले आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *