बुलढाण्याची श्रुती तायडे देशातून २२ वी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

Institute of Company Secretaries of India (ICSI) तर्फे घेण्यात येणाऱ्या सीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुलढाण्याची श्रुती दिलीप तायडे हिने देशातून २२ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये सीएस कोर्सच्या पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, आता सीएस एक्झिक्युटिव्ह (दुसरी फेरी) परीक्षेतही तिने पहिल्याच प्रयत्नात दोन्ही गट उत्तीर्ण करत पुढील फेरीसाठी पात्रता मिळवली. आठपैकी तीन विषयांमध्ये तिने विशेष प्राविण्य संपादन केले आहे.
शिक्षण आणि तयारी
श्रुती सध्या Jijamata Mahavidyalaya Buldhana येथे बी.कॉम. तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने Physics Wallah (PW) यांचा ऑनलाइन कोर्स पूर्ण केला होता.
कौतुकाचा वर्षाव
तिच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, पीडब्ल्यूचे शिक्षक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश गवई, प्रा. जे. जे. जाधव, प्रा. डॉ. सुबोध चिंचोले आणि सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल श्रुतीला आई-वडिलांसह १ मार्च रोजी Noida (दिल्ली परिसर) येथे होणाऱ्या गौरव सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *