लाडकी बहीण योजनेचा दिलासा; मार्च-एप्रिल हप्त्यासाठी ७३०.५१ कोटींचा निधी मंजूर शासन निर्णय जारी; लवकरच लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होणार

KHOZ MASTER
1 Min Read

मुंबई

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल २०२६ या दोन महिन्यांच्या थकीत हप्त्यांच्या वितरणासाठी राज्य शासनाने ७३०.५१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

जुलै २०२४ पासून सुरू झालेली ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मार्च-एप्रिल महिन्यांच्या हप्त्यांबाबत लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. काही महिलांच्या खात्यात एकाच महिन्याचा हप्ता जमा झाला होता, तर काहींना दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले नव्हते.

या पार्श्वभूमीवर १४ मेपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्यांचे वितरण सुरू करण्यात आले होते. मात्र उर्वरित पात्र लाभार्थ्यांना अद्याप रक्कम मिळाली नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करत आज (२१ मे) अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.

वित्त विभागाच्या मान्यतेनंतर हा निधी आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. पुढील काही दिवसांत उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांचे थकीत हप्ते जमा होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.

0 9 7 4 0 4
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *