संग्रामपूरचे कवी दीपक उमाळे यांना ‘राज्य कवी युवा नायक’ बहुमान

KHOZ MASTER
1 Min Read

संग्रामपूर प्रतिनिधी :

‘आवाज लेखणीचा’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी Deepak Bhagwan Umale (रा. बोडखा, ता. संग्रामपूर) यांनी आपल्या उत्कृष्ट काव्यरचनेच्या जोरावर ‘राज्य कवी युवा नायक’ हा बहुमान पटकावला आहे.
दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन BSF Bahuuddeshiya Sanstha (अमरावती), Sant Kabir Bahuuddeshiya Sanstha (बुलढाणा) आणि Upekshit Nayak News यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
भूषण नि. सरदार आणि अध्यक्ष कृष्णा मुदगल यांच्या हस्ते दीपक उमाळे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातील नामवंत कवींनी सहभाग घेतलेल्या या दिमाखदार कवी संमेलनात दीपक उमाळे यांनी सादर केलेल्या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या काव्यरचनेतील शब्दसामर्थ्य, आशयघनता आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्यांना हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला.
दीपक उमाळे यांच्या या यशामुळे संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात त्यांनी विदर्भाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

0 9 4 6 2 0
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *