मुक्ताईनगर प्रतिनिधी :
देशातील सुमारे ८१ लाखांहून अधिक EPS-95 पेन्शनर्सच्या न्यायहक्कासाठी लढा देणाऱ्या EPS 95 National Agitation Committee (NAC) च्या शिष्टमंडळाने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार Raksha Khadse यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यापूर्वी पंतप्रधान Narendra Modi, केंद्रीय श्रममंत्री Mansukh Mandaviya तसेच केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागण्या रास्त असल्याचे मान्य करून सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप किमान पेन्शनवाढीबाबत ठोस निर्णय न झाल्याने NAC ने येत्या ९, १० व ११ मार्च २०२६ रोजी Jantar Mantar, नवी दिल्ली येथे “करो या मरो” संकल्पनेनुसार तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
प्रमुख मागण्या
किमान ७५०० रुपये मासिक पेन्शन
महागाई भत्ता लागू करणे
पती-पत्नी दोघांनाही मोफत आरोग्य सुविधा
गत दहा-बारा वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलन छेडण्यात आली आहेत. बुलडाणा येथील संघटनेच्या मुख्यालयासमोर तब्बल २६२० दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एच. एन. व्यवहारे (उपसचिव, NAC महाराष्ट्र प्रदेश) व पी. एन. मिरगे (जिल्हाध्यक्ष, बुलडाणा) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रक्षाताई खडसे यांना आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी “वृद्ध पेन्शनर्सच्या न्यायहक्कासाठी आवश्यक ते प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
मुक्ताईनगर येथे झालेल्या सभेत “अभी नहीं तो कभी नहीं” व “जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा जारी है” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. तब्येतीमुळे उपस्थित राहता न येणाऱ्या सदस्यांनी सभासद फी व आंदोलन निधी जमा करून लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
देश उभारणाऱ्या वृद्धांना न्याय मिळवून देण्यासाठी आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास मलकापूर, जामनेर, भुसावळ व मुक्ताईनगर येथील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 23