राहेरी बु. : डॉ. शिवानंद भानुसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती

KHOZ MASTER
2 Min Read

राहेरी बु.प्रतिनिधी :

सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक, समीक्षक तसेच सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय अभ्यासक डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांची Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) च्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण Sharad Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde यांच्या मान्यतेने, पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केली.
शैक्षणिक व सामाजिक कार्याची पार्श्वभूमी
डॉ. शिवानंद भानुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असून सध्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व कवी म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांनी २० व्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून विविध साहित्य व कवी संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
भारतीय संविधान तसेच मराठा व इतर आरक्षण विषयांचे ते गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असून संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
वैचारिक प्रगल्भतेची दखल
डॉ. भानुसे यांची वैचारिक प्रगल्भता, विविध विषयांवरील सखोल अभ्यास, समाजकार्याचा अनुभव व जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. विविध टीव्ही चॅनेलवरील चर्चांमध्ये त्यांचा नियमित सहभाग असतो तसेच विविध वर्तमानपत्रे, साप्ताहिके व मासिकांमध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी प्रभावी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 9 4 6 0 9
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *