देऊळगाव राजा : श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

KHOZ MASTER
2 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :

स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन अर्थात कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाहीर सुखदेव साळवे यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच प्रबोधनपर गीत गायन कार्यक्रमही सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक अॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण साहित्यिक कडुबा बनसोडे, ज्येष्ठ कथाकार बबन महामुने, शाहीर सुखदेव साळवे आणि सौ. मंगल साळवे यांची उपस्थिती लाभली.
मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी V. V. Shirwadkar (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी “साहित्यिकांनी समाजप्रबोधनासाठी ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे,” असे मत व्यक्त केले. कडुबा बनसोडे यांनीही साहित्यिकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून लेखन करावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी मराठी भाषा संवर्धन व जनजागृती विषयक विचार मांडले. शाहीर सुखदेव साळवे आणि त्यांच्या कलापथकाने प्रबोधनपर गीते सादर करून उपस्थितांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. भक्ती लटके हिने केले. अतिथी परिचय डॉ. ज्योती ढोकले-देशमुख यांनी करून दिला, तर प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. सौ. सीमा धुळे यांनी मानले.
या कार्यक्रमास रामेश्वर वायाळ, रमेश नरोडे, डॉ. डी. व्ही. खरात, रमेश खंदारे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 6 0 9
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *