सिंदखेडराजा प्रतिनिधी :
Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. शिवानंद नारायणराव भानुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Sharad Pawar यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde यांच्या मान्यतेने सरचिटणीस रविंद्र पवार यांनी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर केली.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असलेले डॉ. भानुसे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. ते सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक आणि सामाजिक-राजकीय अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
गेल्या २५ वर्षांपासून ते संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रिय होते. तसेच मराठा सेवा संघाच्या विविध पदांवर त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ पासून ते पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते. प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर नव्याने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. भानुसे यांनी २० व्या झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. विविध साहित्य व कवी संमेलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भारतीय राज्यघटना तसेच मराठा व इतर आरक्षण विषयांचे ते गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. विविध सामाजिक आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून राज्यभर व्याख्यानांद्वारे ते सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय विषयांवर भाष्य करत असतात.
विविध टीव्ही चर्चांमध्येही त्यांचा नियमित सहभाग असतो. प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Users Today : 23