मोताळा प्रतिनिधी :
तालुक्यातील Sevagiri Baba Industrial Training Institute (आयटीआय) येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, दररोज ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने संस्थेसमोर अधिकृत एस.टी. बस थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी Maharashtra State Road Transport Corporation च्या विभागीय नियंत्रण कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावर उतरून लांब अंतर पायी चालत जावे लागते. विशेषतः मुली, ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच सकाळ-संध्याकाळच्या वेळेत ये-जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताचा धोका लक्षात घेता तातडीने एस.टी. बस थांबा सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक उपस्थिती वाढण्यास मदत होईल तसेच सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. संबंधित प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी स्थानिक नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या मागणीस पाठिंबा दर्शविला असून लवकर निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा Krantikari Shetkari Sanghatana च्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देताना अमोल मोरे, महेंद्र जाधव, शत्रुघ्न तुपकर, पवन काकडे, नितीन सोनटक्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 27