मुबई प्रतिनिधी (संजय धाडवे) सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरणचे उदात्तीकरण होऊ देणार नाही- संभाजी राजे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे समर्थन- सध्या भारतात ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती करण्याची जणू काही चढाओढ लागलेली आहे, कुठलाही अभ्यास न करता तुटक ज्ञानाच्या आधारावर सिनेमॅटिक लिबर्टी च्या नावाखाली अतिशय आक्रस्ताळेपणा ने ऐतिहासिक सिनेमांची मोडतोड करून ती आपल्या गळी उतरवली जात आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन हरहर महादेव तसेच वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांवर जाहीर नाराजी व्यक्त करत निर्माते व दिग्दर्शक यांना इतिहासाची मोडतोड केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम दिला आहे,,*राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग कडून छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचं पूर्ण समर्थन आम्ही देत आहोत त्यांचा समर्थन आम्ही करत आहोत भविष्यात केंद्राने व राज्य सरकारने चित्रपट सेंसोर बोर्डावर ऐतिहासिक संशोधक मंडळावर सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, याबाबतीतलं निवेदन आम्ही आमच्या राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने देणार आहोत ,जेणेकरून भावी पिढीसाठी मोडतोड झालेला व जाणीवपूर्वक केलेला इतिहास हे व्यावसायिक लोक मांडणार नाहीत, लवकरच याबाबतीत मी स्वतः आदरणीय महाराजांची लवकरच भेट घेऊन चर्चा करणार आहे, तसेच या बाबतीतलं पत्र आदरणीय मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्य सांस्कृतिक मंत्री,,, केंद्रीय सेंसर बोर्ड, महाराष्ट्रातलं सेंसर बोर्ड अशा सर्वांना आम्ही आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भेटून निवेदनाद्वारे देणार आहोत आणि आगामी येणाऱ्या ऐतिहासिक सिनेमांकडे राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग कटाक्षाने अभ्यासपूर्वक लक्ष देणार आहोत,