दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला एन. सी. सी. विभागातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले गेले. स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीमती एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, प्रमुख वक्ता म्हणून स्टुडेंट फोरम – स्पर्धा परीक्षा अकॅडमी अकोलाचे संचालक श्री. वीरेंद्र वरोकार, प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल व डॉ. महेश डाबरे यांच्या उपस्थितीत तर महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॅप्टन डॉ. अनिल तिरकर प्रस्तावना करताना म्हणाले की, मानवी जीवन हे परीक्षांनी भरलेले असते. परीक्षांच्या मैदानातून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा मार्ग जातो. परीक्षा झाल्यानंतर येणाऱ्या निकालाची मनाला लगलेली हुरहुर, यशाचे कौतुक किंवा अपयशाचा अनुभव येतो. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री. वीरेंद्र वरोकार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा काळातील अनुभव सांगितले. स्पर्धा परीक्षा नोकरी मिळवण्याचा कसा राजमार्ग आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच पी. एस. आई. ची परीक्षाची तयारी करतांना काय करायला पाहिजे यशाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यासोबत दिलखुलास चर्चा करून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सामना कराव्या लागणाऱ्या गोष्टीचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांनी परीक्षा काळातील त्यांचे अनूभव सांगितले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात परीक्षांना अनन्य महत्त्व आहे. या परीक्षांचे अडथळे पार करूनच मानवाने उच्च शिखर गाठले आहे. या कार्यक्रमासाठी 320 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्योती माहेश्वरी, डॉ. स्वाती तिवारी, डॉ. दीपिका बियाणी, प्रा. चितलांगे, प्रा. डांगे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सार्जंट जयश्री हरसुलकर आणि आभार कॅडेट अवंतिका खंडार हिने केले. कार्यक्रमाला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी एन. सी. सी. विभागाला शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट किरण माने, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी ठाकरे आणि इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली.