हिंगोली जिल्हा प्रतिनिधी ,बालाजी देशमुख –सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा फाटा ते सरहद्दीपर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रोडचे काम प्रगतीपथावर चालू आहे परंतु सदरील रोडचे काम अंदाजपत्रकानुसार होत नाही शासनाने अंदाजपत्रकानुसार दिलेल्या होत नाहीत
सदरील रोडला पहिला दुसरा तिसरा टप्पा कोट चे काम अंदाजपत्रकानुसार होताना दिसत नाही त्यामुळे सर्व रोडची तपासणी करणे अतिशय गरजेचे असून सदरील रोडच्या कामावर पाण्याचा वापर कमी प्रमाणात झाल्यामुळे रोडचे काम उखळत आहे या सर्व प्रकारचे अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांची दुर्लक्ष होताना दिसत आहे
सदरील रोडचे काम दहा वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालय अंतर्गत झाले होते संबंधित रस्ता हा बऱ्याच जागावर खराब झाल्यामुळे रोडचे पूर्ण काम नवीन करण्याचे अभियंता यांनी ठरविले आहे. परंतु नवीन कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार होत असून सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार होत नाही
संबंधित रोडच्या अभियंत्याकडे अंदाजपत्रकांच्या तसेच वर्कआउट ची माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत यामुळे संबंधित अभियंता यांचे कॉन्ट्रॅक्टदारासोबत हित संबंध असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टदार यांची कुठल्याच प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी आता परिसरातील सुज्ञ नागरिकाकडून होत आहे.