हिंगोली जिल्हा ,बालाजी देशमुख सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द दलित वस्तीच्या निधीमध्ये मोठा अपहार. माननीय आयुक्त यांनी दत्तक घेतलेले गाव केंद्रा खुर्द या गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे परंतु स्थानिक ग्रामपंचायत तसेच शाखा अभियंता दोघांनी संगणमत करून सदरील काम हे अंदाजपत्रकानुसार न करता स्वतःचे हित साधण्याच्या हेतूने अंदाजपत्रकाच्या सर्व बाबी धाब्यावर ठेवून जमिनीवर डायरेक्ट डस्ट टाकून पेवर ब्लॉक बसवण्याचे काम केले आहे दलित वस्तीतील सुज्ञ नागरिकांनी दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे जिल्हा प्रतिनिधी बालाजी देशमुख यांना तात्काळ त्या निकृष्ट दर्जाच्या कामावर बोलवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यामुळे तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे दलित वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून सेनगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ची माननीय सहाय्यक आयुक्त हिंगोली यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या सर्व कामाची समिती नेमून पाहणी करावी तसेच अंदाजपत्रकानुसार सर्व बाबी साहित्य सामग्री वापरल्या गेली का याची शहानिशा करावी तसेच यामध्ये दोषी असलेले शाखा अभियंता यांच्यावर सुद्धा कायदेशीर कार्यवाही करावी व शासनाच्या अपहार केलेला निधी त्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्याकडून रिकव्हर करून अंदाजपत्रकानुसार कामे करून घ्यावी अशी मागणी आता सेनगाव तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून होऊ लागली आहे .