परमेश्वर सावंत सेनगाव शहर- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, बाभुळगाव, आजेगाव, पुसेगाव, हे चार सर्कल अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील संपाला पाठिंबा देत गावालगत जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले..सदर मंडळांना अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळल्याने तालुक्यात ठीक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. गोरेगावात गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्याच्या वतीने अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुद्द संप सुरू आहे. तरी देखील शासनाने अद्यापही याबाबत दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ राज्याचे कृषिमंत्री आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या प्रतिमेचे परिसरातील शेतकऱ्यांनी दहन केले. संपाची हाक शासनापर्यंत पोहोचली नसल्याने वरखेडा येथील शेतकऱ्यांनी गावालगत असलेल्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.. यावेळी गजानन सावंत, राधेश्याम कावरखे, नामदेव पतंगे युवा जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंगोली, गजानन कावरखे,साहेखा पठाण, सचिन पुरी, बळीराम महाराज, आदीसह अनेक शेतकरी उपस्थित होते..