बोरगाव वैराळे येथे कोजागिरी निमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम !

Khozmaster
2 Min Read

बोरगाव वैराळे प्रतिनिधी अशोक भाकरे बाळापुर तहसिल अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे श्री जागेश्वर मंदिर सेवा समिती व स्थानिक ग्रामपंचायत चे सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष सदाशिव गावंडे यांच्या पुढाकाराने श्री जागेश्वर मंदिरात कोजागिरी निमित्ताने व्यसनमुक्तीवर आधारित हभप रामदास महाराज अवताडे,हभप हांडे महाराज हिंगोली भारुडाचा व संपूर्ण गावकऱ्यांसाठी सामूहिक कोजागरीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या वेळी हभप रामदास महाराज अवताडे यांनी दारू पिणाऱ्या व्यक्तीची हुबेहुब भुमिका करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते यातच दारुडयाच्या पत्नीची भुमिका हांडे महाराज यांनी वठविली दारू चे व्यसन करणाऱ्या व्यक्तीचे घर कसे उध्वस्त परिवाराचे काय हाल होतात दारूचे व्यसन किती वाईट हे हुबेहुब करून दाखविले आणि गावातील उपस्थित असलेल्या नवतरुण मंडळी कडून आयुष्यात कधीच दारूचे व्यसन करणार नाही याची शपथ घेतली तसेच आज कोजागिरी आहे तुमच्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि गावातील कर्ती मंडळी गाव व्यसन मुक्त व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे सामूहिक कोजागरीचा कार्यक्रम ठेवला आहे हि बाब अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन यावेळी हभप रामदास महाराज अवताडे यांनी केले या कार्यक्रमात सदाशिव गावंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठलराव वैराळे, सामाजिक कार्यकर्ते विनायक वैराळे, रामराव शेळके, मंगेश वैराळे, बळीराम वैराळे, बाळू वैराळे, सुनील गावंडे, माणिकराव वैराळे,बाळू गोसावी, राजेश मात्रे, पुरूषोत्तम शेळके, विठ्ठल दुगाणे,श्रीदत्ता सुरतकार,नागोराव धांडे,रामा घाटे,प्रदीप वाकोडे, पांडुरंग बाहकर, रामभाऊ सुर्यवंशी, गजानन मात्रे, शंकर इंगळे, हरिभाऊ दांगटे, प्रमोद वैराळे, आशिष वैराळे, दिवाकर वैराळे, ज्ञानेश्वर शेळके, मनिष वैराळे, सागर डोंगरे,माणिकराव वानखडे, पुंजाजी अमरावते, विठ्ठल सुर्यवंशी, जानकीराम बांगर आदीसह बहुसंख्य पुरूष आणि महिला मंडळाचे सहकार्य लाभले हिंगोली येथील हभप हांडे महाराज यांच्या सोबत अजून दोन सहकारी यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी देखील नववधू व लग्न होत नसलेल्या उपवराची भुमिका वठवून समाजात मुलींचा जन्मदर वाढविणे काळाची गरज असून आज पुरूष पेक्षा स्त्रियाची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना बिन लग्नाचं रहावे लागत आहे हि परिस्थिती बिघडू नये म्हणून आताचं जागृत व्हावे लागणार आहे असा महत्त्वाचा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता कोजागिरी चे वाटप करून करण्यात आला

 

0 6 6 8 3 9
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18:07